नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ व घणसोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्राअंर्तगत असलेल्या अनधिकृत बांधकाम धारक श्री. रामचंद्र बाळाराम ठाकूर घर क्र. 105, नेरूळगाव, नेरूळ या इमारतीवर निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार सदरील बांधकाम 14 मजुर, 5 ब्रेकर, 2 गॅस कटर यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी /कर्मचारी यांचे समवेत सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस तैनात होते.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील श्री.राजु सातपुते (घरमालक व विकासक), यांनी सर्व्हे नं.29/30,से.22, तळवलीगांव,घणसोली यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी., तळ+पहिल्या मजल्याचे काम पुर्ण होवुन दुस-या मजल्याच्या कॉलमचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसुन आले. केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम 01 जेसीबी पोकलेन, 06 कामगार यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. तसेच दंडात्मक शुल्क रक्कम रु.50,000/- एवढे वसुल करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी, तसेच पोलिस पथक तैनात होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.