ठाणे : जल जीवन मिशन कार्यक्रमाचे गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन विषयक गाव पातळीवरील भागघारकांचे प्रशिक्षण दि. १६ डिसेंबर २०२४ ते दि. ९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. हिमालय इन्स्टिट्युट फॉर इन्व्हार्यनमेंट इकोलॉजी ॲण्ड डेव्हलपमेंट, संस्था डेहराडून, उत्तराखंड यांच्यामार्फत १ हजार ९७० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षण तांत्रिकदृष्या उत्तम नियोजन करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन केले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरूस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन यासाठी भागधारकांचा सहभाग, तसेच गावपातळीवर पाणी विषयक समस्या वेळेत सोडवण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन विभागामार्फत प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येत आहे. ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, समितीचे सचिव, पाणीपुरवठा कर्मचारी/ जल सुरक्षक, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे (VWSC ) किंवा नळ पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्ती साठी निवड केली असल्यास त्या संस्थेचे जसे स्वयंसहाय्यता महिला बचत गट/प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (Primary Agricultural Co-opretive Socities-PACS) व निवडलेल्या अन्य संस्थेतील सदस्य, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे (VWSC) महिला सदस्य किंवा नळ पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्ती साठी निवड केली असल्यास त्या संस्थेचे जसे स्वयंसहाय्यता महिला बचत गट / प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (Primary Agricultural Co-opretive Socities-PACS) व निवडलेल्या अन्य संस्थेतील महिला सदस्य तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग या प्रशिक्षणात असणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुरबाड – ४४५ प्रशिक्षणार्थी, शहापुर -५५० प्रशिक्षणार्थी, भिवंडी – ६०५ प्रशिक्षणार्थी, कल्याण -२३० प्रशिक्षणार्थी, अंबरनाथ – १४० प्रशिक्षणार्थी असे जिल्ह्यातील एकूण १ हजार ९७० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण होणार असल्याबाबतची माहिती प्रकल्प संचालक(जलजीवन मिशन) प्रमोद काळे यांनी दिली आहे.
