आयुक्त विकास ढाकणे यांचा पुढाकार
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या अंशदायी निवृत्ती वेतन(डिसीपीएस)योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत असताना मृत पावलेल्या 2005 नंतरच्या 28 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन लागू करण्यात आली आहे.
त्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी पुढाकार घेतला असून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पूर्तता केली आहे.
यापूर्वी या योजनेची ठोस तरतूद नव्हती.अशावेळी महाराष्ट्र शासनाने 2005 नंतर कामाला लागलेल्या व सेवेत असताना मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना फॅमिली पेंशन लागू करण्याचा निर्णय घेतला.
तसा शासन निर्णयाचा आदेश प्राप्त होताच आयुक्त विकास ढाकणे यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश लेखा कार्यालयाला दिले.त्यानुसार मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पडताळणी केली असता, महानगरपालिकेत 2005 मध्ये नंतर कामाला लागलेले एकूण 28 कर्मचारी हे मृत झाल्याचे आकडेवारी समोर आली.हे कर्मचारी जेंव्हा मृत पावले तेंव्हा त्यांचे मासिक बेसिक किती होते त्याअनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन मिळणार आहे.
0000