ठाणे : कायदेतज्ञ रमाकांत दत्तात्रय ओवळेकर स्मरणार्थ पुरस्कार सोहळा-2024 नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश उमेश साळवी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विलास गोडबोले, पार्श्वगायिका अपर्णा मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात अद्वितीय व्यक्तीत्व पुरस्कार नदीम मेमन (क्युरेटर क्रिकेट मैदान – क्रीडा क्षेत्र आणि कायदेतज्ञ अरुण नावरे (कायदा क्षेत्र) यांना तर इंद्रधनुष्य पुरस्कार कु. प्रियांका काळण (चित्रकारीता), मानवतावादी पुरस्कार – आदित्य पवार आणि सप्तसूर पुरस्कार (गायन) – डॉ. पद्माकर देसाई, राजेश नाडकर्णी, विजय रुमडे, श्रीधर देशपांडे, सौ. अपर्णा वाडदेकर, श्रीमती मनीषा रानडे आणि श्रीमती शैलजा पाटील व प्रोत्साहन पुरस्कार – क्रीडा – सेजल यादव, वैष्णवी शिंदे, समिक टेमकर आणि विहंग विचारे त्याचप्रमाणे गायन – मिश्ठी बोरीचं व निर्वी पांडे यांचा समावेश होता.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुर सुदान शौर्या स्वर संस्थेचे पदाधिकारी किरण राणे, सागर जोशी आणि सौ. समता यांनी केले अशी माहिती सोहळ्याचे निमंत्रक सौ. नम्रता ओवळेकर राणे यांनी दिली आहे.
00000