नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त…
२- लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकाची विक्रमी कामगिरी
पुणे – कोथरुडमधील लेखक संजय दुधाणे यांच्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या मेजर ध्यानचंद इंग्रजी चरित्र पुस्तकाने सर्वाधिक खपाचा नवा विक्रम केला आहे. दोन वर्षात पुस्तकाच्या 6 आवृत्या प्रकाशित झाल्या असून तब्बल 20 हजार पुस्ताकांची विक्री झाली आहे. पुण्यात सुरू असलेल्या पुणे बुक महोत्सवतही या पुस्तकाला मोठी मागणी आहे.
मूळात महाराष्ट्रात क्रीडाविषयक लेखक करणारे लेखक दुर्मिळ आहे, त्यात क्रीडा पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशकही फारसे उललब्ध नसताना संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे देशात कौतुक होत आहे. नॅशनल बुक ट्रस्टने 2023 मध्ये मेजर ध्यानचंद यांचे चरित्र सर्वप्रथम प्रकातित केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नॅशनल बुक ट्रस्टने इंडिया 75 या शिर्षकाअंतर्गत देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्या 75 महान व्यक्तिमत्वाची निवड केली होती. यात दुधाणे यांच्या मेजर ध्यानचंद चरित्र पुस्तकाचा समावेश करण्यात आला.
2023 मध्ये नॅशनल बुक ट्रस्टकडून ओरीसा, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मिर, राजस्थान येथील राज्य शासनाने अभ्यासक्रमासाठी मेजर ध्यानंचद चरित्र पुस्तकांची खरेदी केली. तसेच नॅशनल बुक ट्रस्टच्या दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बुक महोत्सवातही या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंंत 20 हजार पेक्षा अधिक प्रति मेजर ध्यानचंद पुस्तकाच्या खरेदी केल्या गेल्या आहेत. या पुस्तक विक्रीतून तब्बल 6 लाख रूपयांचे मानधन दुधाणे यांच्या खात्यात जमा झाले आहे.
संजय दुधाणे यांच्या याच पुस्तकातून बालभारती इंग्रजी माध्यमातील पाचवीच्या पाठपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. प्रा. दुधाणे यांनी मेजर ध्यानचंदसह देशाचे पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव, मेरी कोम, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग यांची चरित्रही लिहिली आहेत. या पुस्तकांचाही एकापेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.