ठाणे : श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (प.) या ठिकाणी शनिवारी आंतरशालेय स्तरावर २० व्या वार्षिक लोककला नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.   ग्रामीण व शहरी लोककलांची संकल्पना बालमनात रूजावी आणि लोककलांचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रात चिरकाल जपून ठेवावा या सदहेतूने या आंतरशालेय लोककला नृत्यस्पर्धेला वर्षानुवर्ष प्रोत्साहन दिले जात आहे.
या स्पर्धेत विविध शाळांनी सहभाग दिला असून विद्यार्थ्यांनी दर्शवलेला लोककलेचा नेत्रदिपक नृत्य आविष्कार सर्वच शाळांनी उत्कृष्टपणे सादर केला. या नृत्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी बाहेरील लोककला नृत्यतज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
सहभागी नृत्य गटातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक रु. 5000, द्वितीय क्रमांक रु. 4000, तृतीय क्रमांकास रु. 3000 व ट्रॉफी ही बक्षिसे देण्यात आली. प्रोत्साहनार्थ दोन शाळांना प्रत्येकी 1000 रु. ची बक्षीसे प्रदान करण्यात आली तसेच कोरीओग्राफर्सना अनुक्रमे 1500, 1000, 500 रुपयांची बक्षीसे, शाळेच्या मुख्याध्यापिका मिनी नायर यांच्या हस्ते बक्षीसे वितरीत करण्यात आली. या बक्षीस समारंभास सेजल नारंग, मुख्याध्यापिका श्री माँ बालनिकेतन, मेघना वांगे, लक्ष्मी अय्यर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *