मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्या धामणकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे. २५ डिसेंबर, सायंकाळी ५.३० वाजता हे व्याख्यान संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. रसिकांनी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण अथवा ध्वनीचित्रमुद्रण करू नये, असेही कळवण्यात आले आहे.