– कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात
कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले.
रविवारी, अग्रवाल कॉलेज ऑडिटोरीयम, कल्याण (प.) येथे, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अनिल थत्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास, आदि मान्यवर ‘प्रमुख पाहुणे’ या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून, डॉ. विजय पंडित; तर, समारंभाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेशचंद्र यांनी भूषविले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक श्री. रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले.