ठाणे : किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम मॉल, यांच्या सौजन्यशील उपक्रम कोरम मॉल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची सदस्य पल्लवी लंके हिने कळवा ब्रीज येथील साठे नगर येथे राहणाऱ्या वस्तीतील मुलींना एकत्रित करून त्यांना ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला व सिंधुदुर्ग किल्ला तयार करण्यात आला. अतिशय परिसर स्वच्छ व दिमाखात जे साहित्य उपल्ब्ध आहे त्यात त्यांनी अप्रतिम असा किल्ला उभा केला. ह्या किल्ल्याची माहिती संस्थेचे सदस्य राजेंद्र गोसावी सरांनी व्यवस्थित रित्या सांगितली व मुलींना वेळेत घरी पोहचणे देखील गरजेचे होते. याच वेळेस परिक्षणसाठी परिक्षक आले होते. त्यावेळेस परिक्षकांना माहीती दिली. कोरम मॉल येथे १५ डिसेंबर रोजी किल्लेकर या संस्थेच्या निकाल जाहिर झाला आणि श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या मुलींना सिंधुदूर्ग किल्ल्याला तिसरे पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार घेण्यासाठी संस्थेचे सदस्य पल्लवी लंके, निकिता कांबळे व इतर मुलीं उपस्थित होते. सहभागीना प्रमाणपत्र व मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे संस्थापक सदस्य अजय भोसले यांनी दिली.
०००००