६६वी  बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धा

ठाणे : यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा ६ धावांनी पराभव करत ६६ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली.  टी २- प्रारूपात खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या शुभारंभी लढतीत १४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेंबूर जिमखान्याला १४१ धावांवर रोखत कुर्ला स्पोर्ट्स क्लबने दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या  कुर्ला स्पोर्ट्स क्लबला आर्यन मिश्राने ३७, मैत्रीक ठाकूरने ३१ धावांमुळे २० षटकात ८ बाद १४७ धावा करता आल्या. हितेश प्रजापतीने चार बळी मिळवत गोलंदाजीत छाप पाडली. उत्तरादाखल गौरव कुरकुरेने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाजाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने चेंबूर जिमखान्याला विजयाने हुलकावणी दिली.यश पांडेने तीन फलंदाज बाद केले. आर्यन मिश्राला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य मंगेश साटम यांनी स्पर्धेचे रीतसर उदघाटन केले.
संक्षिप्त धावफलक : कुर्ला स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ८ बाद १४७,( आर्यन मिश्रा ३७, मैत्रीक ठक्कर ३१, हितेश प्रजापती २१ धावात ४ बळी) विजयी विरुद्ध चेंबूर जिमखाना : २० षटकात ८बाद  १४१ (गौरव कुरकुरे ५८, यश पांडे २७ धावांत ३ बळी).
युनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद १४५ ( विश्वास गनिया ४२,उद्धव मोरे ६४) विजयी विरुद्ध  खंडाळा क्रिकेट क्लब  : २० षटकात ९ बाद १४४ (जे. मंदिया ५६).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *