मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर)  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता सेवा उद्योगांमध्ये त्यांना पस्तीस वर्षांपेक्षा जास्त समृद्ध अनुभव आहे, त्याद्वारे विनय क्षीरसागर व्यवसायात वाढ, नाविन्य आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमध्ये निपुणता आणणे साध्य करतील.
ते आयएसएसपीएलला चाचणी, तपासणी, शाश्वतता आणि डिजिटल सोल्यूशन्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय वाढवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडबद्दल
आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सर्वसमावेशक चाचणी, तपासणी आणि प्रमाणता सेवा प्रदान करते, ज्यायोगे उद्योगांना त्यांच्या सर्व मूल्यशृंखलांमध्ये गुणवत्ता, सुरक्षितता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी सक्षम करते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता, याद्वारे आयएसएसपीएल विविध क्षेत्रांमध्ये अनुरूप सेवा प्रदान करते, त्यामुळे जागतिक दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करता येते आणि नवकल्पनांना चालना मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *