रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात
Slug – 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार
मुंबई- भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
चिकाटीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच, ही मॅरेथॉन सामाजिक उद्दिष्टाचे प्रतीक ठरली. या कार्यक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी भारतातील पॅरा-अॅथलेटिक चॅम्पियन्सना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रुनवाल रिअल्टीने जिद्द, सामर्थ्य आणि सकारात्मक बदल घडवण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. ह्युमेबल फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे या कार्यक्रमाचे योगदान अधिक व्यापक झाले असून, समाज अधिक समावेशक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
सान्या रुनवाल, संचालक – रिटेल, रनवाल रिअल्टी म्हणाल्या:
“रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचा यशस्वी समारोप करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून आम्हाला खूप समाधान मिळाले. हाफ मॅरेथॉन ठाणेकरांच्या कॅलेंडरवरील महत्त्वाचा कार्यक्रम बनत आहे. गेल्या वर्षी 1800 धावपटूंनी सहभाग घेतला होता, तर यंदा हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. रुनवाल रिअल्टीसाठी हा कार्यक्रम म्हणजे आमच्या समुदायावरचे प्रेम, चिकाटीचा गौरव, आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यावरचा विश्वास याचे प्रतीक आहे. सामाजिक बदलासाठी एक प्रभावी व्यासपीठ उभे करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. पॅरा-अॅथलेटिक चॅम्पियन्सना पाठिंबा देताना त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आम्हाला नव्या शक्यता शोधण्यासाठी सतत प्रोत्साहित करते.”
या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1 माइल अशा चार श्रेणी होत्या, ज्यामुळे प्रत्येक स्तरातील सहभागींसाठी समावेशक अनुभव प्रदान करण्यात आला. धावपटूंना उच्च दर्जाचे ड्राय फिट टी-शर्ट्स, फिनिशर मेडल्स, स्वादिष्ट नाश्ता आणि ₹1,000+ किमतीचे कूपन्स मिळाले. विजेत्यांना ट्रॉफी, खास भेटवस्तू आणि विशेष कूपन्स देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण:
● प्रचंड प्रतिसाद: सर्व श्रेणींमध्ये 3000 हून अधिक सहभागी; त्यात 1200 महिला, 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली.
● निधीचे संकलन: जमा झालेला निधी पॅरा-अॅथलीट्सना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरला जाईल, ज्यामुळे रुनवाल रिअल्टीच्या समावेशकतेच्या संकल्पनेला बळ मिळाले.
● विशेष धावपटू फायदे: सहभागींना ड्राय-फिट टी-शर्ट्स, फिनिशर मेडल्स, नाश्ता आणि ₹1000+ किमतीचे कूपन्स देण्यात आले.
● विजेत्यांचा सन्मान: सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धावपटूंना ट्रॉफी, भेटवस्तूंचे हॅम्पर आणि अतिरिक्त कूपन्स देऊन गौरविण्यात आले.
रीमा कीर्तिकर, मुख्य विपणन अधिकारी, रुनवाल रिअल्टी, म्हणाल्या:
” रुनवाल रिअल्टीमध्ये, आम्ही शहरी जीवनशैलीला नवकल्पना, शाश्वतता आणि समुदाय केंद्रित मूल्यांमध्ये एकत्र करून नव्याने परिभाषित केले आहे. ही मॅरेथॉन त्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे, जिथे व्यक्ती एकत्र येतात, प्रगती करतात आणि उत्कृष्टतेच्या प्रयत्नांचा उत्सव साजरा करतात. जशा आमचे पॅरा-अॅथलीट्स सीमांवर पुनःविचार करत आहेत, तसेच आम्ही प्रत्येक प्रकल्पासोबत जीवनशैलीला उंचावण्याचा आणि पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहणाऱ्या पत्त्यांचे निर्मीती करण्याचा प्रयत्न करतो.”
सितांशू झा, संचालक, प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया, म्हणाले:
” रुनवाल रिअल्टीच्या पाठिंब्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम नवा शिखर गाठू शकला. ठाण्याच्या जोशपूर्ण समुदायासोबत, आम्ही एक अविस्मरणीय मॅरेथॉन आयोजित करण्यास सक्षम झालो.”
“ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” हे ब्रीदवाक्य या कार्यक्रमाचे आणि रुनवाल रिअल्टीच्या प्रवासाचे सार आहे. हे प्रगती, चिकाटी आणि सामूहिक उद्दिष्टांच्या सामर्थ्याचा उत्सव आहे—ज्याद्वारे सर्वांसाठी एक प्रेरणादायक आणि समृद्ध भविष्य घडवले जाते.
०००