अलिबाग : ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. आपल्या चित्रकलेने चंद्रकला कदम यांनी अलिबागचे नाव देशात उंचावले अशा शब्दात थळे यांनी त्यांचा गौरव केला.
यावेळी मापगांवमधिल अनेक मान्यवर चंद्रकला कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होते. चंद्रकला कदम यांनी चितारलेल्या चिंत्रांना महाराष्ट्राच्या विधीमंडळासह देशाच्या संसदेतही मानाचे स्थान मिळाले आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशाच्या संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावले गेले. हे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी चितारले होते.
चंद्रकला कदम यांना शुभेच्छा द्यायला यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पत्रकार चाळके आणि ज्येष्ठ पत्रकार आणि चंद्रकला कदम यांचे पती कुमार कदम उपस्थित होते.
फोटोओळ
ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, पत्रकार वैभव चाळके आणि मापगावचे मान्यवर उपस्थित होते.