२री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सुपेश कामतेकरने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेवर २२-१८, ५-२३, २०-१२ असा चुरशीचा विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या महम्मद साजिदने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीवर ३-१६, १९-१३, १५-१० असा खळबळजनक विजय मिळवून आगेकूच केली. एका वेळी २४ सिस्का कॅरमवर खेळविण्यात येणाऱ्या एकंदर १० लाखाची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर मालदीवज, श्रीलंका व अमेरिकेच्या खेळाडूंच्या सहभागाने हि स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.

संदीप सावंत ( महाराष्ट्र ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र ) ११-८, १४-१५, १७-३

अभिषेक भारंबे ( महाराष्ट्र ) वि वि तुलसीदास हळर्णेकर ( गोवा ) २३-११, ७-२५, २३-१

जलालुद्दीन मुल्ला ( महाराष्ट्र ) वि वि नवीन चीकलापुडी ( अमेरिका ) २५-१३, १६-१७, १९-५

संतोष डोखे ( महाराष्ट्र ) वि वि सचिन बांदल ( महाराष्ट्र ) ८-९, २२-१, २५-१४

राजेश गोहिल ( महाराष्ट्र ( वि वि एस ए. इकबाल ( मध्य प्रदेश ) २५-४, २०-८

संजय मणियार ( महाराष्ट्र ) वि वि यमान जलील (  मालदिवज ) १५-२, १८-८

जुगल किशोर दत्ता ( आसाम ) वि वि प्रफुल रसाळ ( महाराष्ट्र ) ११-५. १६-४

एस के महम्मद ( तेलंगणा ) वि वि प्रकाश दुधाळे (  महाराष्ट्र ) १६-१०, २१-४

हारून शेख ( महाराष्ट्र ) वि वि गिहन चमारा ( श्रीलंका ) ६-१९, २०-२, २५-९

महम्मद अहमद ( तेलंगणा ) वि वि शरद मोरे ( महाराष्ट्र ) १५-०, १७-१०

अनिल मुंढे ( महाराष्ट्र ) वि वि तैमूर अश्रफ ( दिल्ली ) ७-१५, २३-६, २३-०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *