माथेरान : माथेरान मधील युवा रुखी गुजराती समाजाच्या वतीने श्री अंबे मातेच्या पूजेनिमित्ताने मंगळवार दि.१७ रोजी येथील वाल्मिकी नगरात वाल्मिकी बांधवांकडून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन महाभंडाऱ्याचा लाभ घेतला. अत्यंत प्रसन्न वातावरणात वाल्मिकी बांधवांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करून उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, नरेश परदेशी, निखिल शिंदे, प्रकाश सुतार,प्रमोद नायक, मुकुंद रांजणे, जनार्दन पार्टे आदी उपस्थित होते.
युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष गौरंग वाघेला त्याचप्रमाणे अंबालाल वाघेला, दीपक पुरबिया,रुपचंद वाघेला, छगन पुरबिया, राजेश वाघेला,कांती पुरबिया, माजी नगरसेवक संतोष लखन,नरेश पुरबिया यांसह अन्य समाज बांधवांनी हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
0000