किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
मुंबई, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई येथे सुरु आहे. आज झालेल्या किशोरांच्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लब, ओम साईश्वर सेवा मंडळ, सरस्वती स्पोर्ट्स क्लब, विद्यार्थी क्रीडा केंद्राने विजयी घोडदौड सुरु केली आहे. किशोर गटाच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध वैभव स्पोर्ट्स क्लब व सरस्वती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विद्यार्थी क्रीडा केंद्र असा सामना रंगणार आहे
किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने सरस्वती मंदिर हायस्कूलचा (६-२-३-३) ९-५ असा ४ गुणांनी पराभव केला. वैभवतर्फे यश यादवने नाबाद ५ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. सिधांश सावंतने १:३०, २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. शुभम माळीने १:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सरस्वतीतर्फे हार्दिक कारंडेने ३ मि. संरक्षण केले. सार्थक बटावलेने ३:२० मि. संरक्षण केले.
किशोर गटाच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने स्टुडंट स्पोर्ट्स क्लबचा ८-१ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे श्राथिक गामीने नाबाद ७ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. आरव साठमने ४:३० मि. संरक्षण केले. अदिराज गुरवने आक्रमणात २ गडी बाद केले. स्टुडंटतर्फे दिवेक सिंगने २:१० मि. संरक्षण केले.
किशोर गटाच्या तिसऱ्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-६) १०-८ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. सरस्वती तर्फे महेक अडवडेने ३:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. शिवम झाने ३ मॉनिट संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. प्रथमेश तर्पेने २ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. ॐ समर्थतर्फे निहाल शिंदेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ३ गडी बाद केले. देवेंद्र शिंदेने १:३० मि. संरक्षण करुन करुन आक्रमणात २ गडी बाद केले.
किशोर गटाच्या चौथ्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्रने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा (२१-१-४) २१-५ असा १ डाव १६ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी तर्फे अपसर शेखने नाबाद ४:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. आयुष नवलेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. विराज वाघमारेने आक्रमणात ४ गडी बाद केले. श्री समर्थ तर्फे कृशल वाघधरे आक्रमणात ३ गडी बाद केले.
किशोर गटाच्या पाचव्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा (२-२-६-५) ८-७ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला. वैभवतर्फे यश जाधवने नाबाद ४:२०, नाबाद ३:५० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. शुभम माळीने १:२०, १:२० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सोहम नार्वेकरने ६:३०, ३,५० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. संतोष केवटने आक्रमणात २ गडी बाद केले.
00000