मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या विद्यमाने व युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने २८ डिसेंबर ते १जानेवारी या कालावधीत ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा चिंचबाग मैदान, सांगलवाडी, सांगली येते होईल. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला कुमार/कुमारी गटाचा संघ ८ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.
मातीच्या ६ क्रीडांगणावर होणारी ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संलग्न जिल्हा मुलींच्या संघाने २७ डिसेंबरला सायं. ०४-०० वा. स्पर्धेच्या स्थळी आपली उपस्थिती राखाव. त्याच दिवशी मुलींची वजने व छाननी केली जाईल. तर मुलांच्या सर्व संघानी २९ डिसेंबर सायं. ०४-०० वा. आपली उपस्थिती राखावी. मुलांची वजने व छाननी २९ डिसेंबरला करण्यात येतील. सर्व जिल्हा संघटनांच्या सचिवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन राज्य कबड्डी असो. चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे.
0000