छायाचित्र ओळ-जरंडी जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा घेतांना
सोयगाव : जरंडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुधवरी (ता.१८) दुपारी दोन वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवी या गटात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या मराठवाड्यात प्रथम आलेल्या जरंडी ग्रामपंचायतने गाव विकासा वर आधारित ही निबंध स्पर्धा आयोजित केली यामध्ये शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमात गावात झालेल्या विविध विकास कामांवर दोनशे शब्दात निबंध लिहायचा होता या स्पर्धेत सुमारे२२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब सुल,भूपेंद्र जांभूळकर,हितेश मेश्राम,लक्ष्मण शेंगोकर,प्राजक्ता कापसे, राजकुमार दिवेकर, सुनील सोनवणे, विलास वालदे,युनूस शेख आदींनी पुढाकार घेऊन ही निबंध स्पर्धा पार पडल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील, संतोष पाटील,सतीश बाविस्कर आदींची उपस्थिती होती निबंध स्पर्धेचा निकाल शुक्रवारी (ता.२०) घोषित करून प्रथम,द्वितीय व त्रितीय विद्यार्थ्यांना आकर्षित बक्षिसे देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले