टिटवाळा स्थानकातील समस्यां सोडविण्यासाठी केली चर्चा

कल्याण : मध्य रेल्वे अंतर्गत टिटवाळा रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य व अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. टिटवाळा स्थानक भारतीय रेल्वेच्या महत्वकांक्षी अशा अमृत भारत योजनेत समाविष्ठ केले आहे. तसेच गतीशक्ती योजनेतून देखील या स्थानकाचा विकास होत आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर या स्थानकाचे स्वरुपच बदलून जाणार आहे. यासाठी भारत सरकारच्या सुचनेनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने टिटवाळा रेल्वे स्थानक सल्लागार समिती गठित केली आहे. या स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाल्यानंतर केडीएमसीच्या माजी उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापक यांना भेटून विविध मागण्यांचे पत्र दिले होते.
त्यापेकी मागण्यासंदर्भात सल्लागार समिती आणि प्रशासन यांची दि.17 ऑगस्ट 2024 रोजी महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली होती. टिटवाळा रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य अनिल फड, अजय मिश्र, विजय आव्हाड, स्वप्निल पाठारे, गिरिष भोय व धनंजय कान्हेरे तथा रेल्वे विविध विभागाचे अधिकारी या सल्लागार समिती बैठकिसाठी उपस्थित होते. यावेळी सदस्यांनी विविध समस्या मांडल्या, तक्रारी केल्या व संबंधित तक्रारींचे निवारण लवकर करण्याच्या सुचना प्रशासनास केल्या. तसेच अधिकारी व सदस्यांनी परिसराची पाहणी केली. परिसरात होणारे अतिक्रमण, अवैध बाबी आणि अतक्रमण यासंबधी तात्काळ लक्ष घालण्याच्या कडक सुचना दिल्या गेल्या आहेत.
टिटवाळा स्टेशन परिसराचा विकास हा दोन फेज मध्ये होणार असून समितीने पहिल्या बैठकित केलेल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर झाल्या असून सर्व सुचनांचा समावेश सुध्दा विकास आराखड्यात केला असल्याचे रेल्वे प्रशासनाने या वेळी सांगितले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे माजी उपमहापौर उपेक्षा भोईर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कल्याण दिशेला मांडा पूर्व -पश्चिम रहिवांशासाठी पादचारी पुल बंद केलेल्या रेल्वे गेटवर मंजूर करण्यात आला आहे. महिलासांठी विशेष हिरकणी कक्ष तयार होणार असल्याचेही उपस्थित अधिकारी यांनी सांगितले आहे.
टिटवाळा रेल्वे स्टेशन विकासासंबंधी काहिही समस्या किंवा सुचना असतील तर आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन टिटवावा रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या वतिने नागरिकांना व प्रवाशांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *