अमित शाह यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अवमान वक्तव्याच्या निषेधार्थ

अनिल ठाणेकर
मुंबइ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे, या अवमानकारक विधानाचा निषेध करण्यासाठी आज दुपारी ३.३० वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर पूर्व येथील निवासस्थान राजगृह येथे जमून ‘राजगृह ते चैत्यभूमी मार्च’ काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, छायाचित्रे घेऊन संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता मुल्यांवर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणार्या नागरिकांनी, तसेच लेखक, कलावंत, साहित्यिक, पत्रकार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शाम गायकवाड, प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, राजू कोरडे, अजित पाटील, सुबोध मोरे, उर्मिला पवार, राहुल गायकवाड, शाहीर संभाजी भगत, वृषाली माने, रवी भिलाणे, सुनील कदम, जयवंत हिरे यांनी केले आहे.
परभणीतील दडपशाही, सोमनाथ सुर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा सर्व संविधानप्रेमी, समतावादी, पुरोगामी संघटना कडून देशभरात निषेध होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करुन गृहमंत्री अमित शाह हे संविधान मुल्यांच्या विचारांच्या विरोधातील अवैज्ञानिक, मनुवादी विचारांचाच पुरस्कार छुप्या पद्धतीने करीत आहेत.ते ज्या संविधानाची शपथ घेऊन गृहमंत्री बनले त्या संविधानाशी विसंगत त्यांचे वर्तन आहे.त्यांच्या या अवमानकारक विधानाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.त्यांनी यासाठी राज्यसभेतच देशाची जाहीर माफी मागावी, अन्यथा गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.मुंबई मध्ये या अवमानकारक विधानाचा निषेध करण्यासाथी आज दुपारी ३.३० वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर पूर्व येथील निवासस्थान राजगृह येथे जमून ” राजगृह ते चैत्यभूमी मार्च ” निघणार आहे.या मार्चमध्ये प्रागतिक रिपब्लिकन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती,लाल निशाण ( लेनिनवादी) लाल निशाण ,भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( माले) लिबरेशन,ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक,संविधान संवर्धन समिती,लोकांचे दोस्त, आंबेडकरी स्त्री संघटना,राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन,वाघिणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती  आणि विविध आंबेडकरी, पुरोगामी, समतावादी, युवा , विद्यार्थी, महिला आणि आंबेडकरी, समतावादी लेखक, कलावंत, सांस्कृतिककर्मी यांचा सहभाग असणार आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *