ठामपा आयुक्त सौरभ राव यांना संघर्ष कृती सेवा संस्थेच्या वतीने निवेदन
ठाणे : खारीगाव पाखाडी मधील काशिनाथ पाटील मार्ग ते हिरादेवी मंदिर हा मंजूर झालेला डीपी रस्ता रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष कृती सेवा संस्थेच्या शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना भेटून केली आहे. या शिष्टमंडळात संघर्ष कृती सेवा संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील, उपाध्यक्ष गजानन पवार, सिकंदर केणी, माजी नगरसेवक शाम पाटील, सचिव राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डीपी रस्त्यात बाधित झालेल्या सोसायटी व स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांच्या नावे दिलेल्या हरकती देखील जोडण्यात आल्या. तसेच खारीगाव पाखाडी मधील स्व. काशिनाथ पाटील मार्ग ते हिरादेवी मंदिर हा मंजूर झालेला डीपी रस्ता रद्द करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना संघर्ष कृती सेवा संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.