माथेरान : माथेरान सारख्या दुर्गम भागात तीन ते चार किलोमीटर अंतरावर शाळेत जाऊन शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील महाविद्यालयात शिक्षण घेणे ही खर्चिक बाब आहे. येथील सेंट झेव्हीयर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर कु.आकांक्षा शिवाजी शिंदे हिची डॉक्टर होण्याची इच्छा असल्याने तिचे वडील माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी मुंबईतील महाविद्यालयात आकांक्षाला प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर जवळपास साडेसहा वर्षांचा अवघड अभ्यासक्रम पुर्ण करुन ती
बि.डी.एस. परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. कु. आकांक्षा ही डाॅक्टर आकांक्षा झाली आहे. यानिमित्ताने माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तसेच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
——————————————————-
माथेरानच्या मुली या अनन्यसाधारण चिकाटी आणि कष्टाने यश मिळवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालय.
माथेरानकरांसाठी हा निश्चितच आनंदाचा अणि अभिमानाचा क्षण आहे.
मनोज खेडकर — माजी नगराध्यक्ष माथेरान
—————————————————–
आकांक्षा हीचे मनःपूर्वक अभिनंदन.तिने गेली सहा वर्षे अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तिच्या मेहनतीचे व चिकाटीचे हे यश आहे आकांक्षा डॉक्टर झाल्याने सर्व माथेरान करांसाठी कौतुकास्पद बाब आहे.
सुनिल शिंदे– सामाजिक कार्यकर्ते माथेरान