आमदार बाळा नर यांची विधानसभेत मागणी
केतन खेडेकर
जोगेश्वरी गुंफा परिसरात गेल्या 50 वर्षापासून अस्तित्वात असलेली जयंत चाळ ही सन 2004 मध्ये पुनर्वसनाकरिता निष्कासित करण्यात आली होती. याठिकाणी महानगरपालिकेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले.जोगेश्वरी गुंफे परिसरात झोपडयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्योवळी घरे अगोदरच निष्कासित केलेली असल्यामुळे आणि तेथे ते राहत नसल्याने त्यांचे सर्व्हेक्षण शासनामार्फत करण्यात आले नाही. त्यामुळे या 18 रहिवाश्यांना पात्र ठरविण्यात न आल्यामुळे सध्यस्थितीमध्ये 18 रहिवाशी बेघर झालेले आहे. गेली 50 वर्षे राहत असलेल्या रहिवाश्यांचे केवळ सर्व्हेक्षण न झाल्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. रहिवाश्यांवर होत असलेला अन्याय पाहता शासनाने तातडीने त्यांना न्याय दयावा याकरिता औचित्याच्या मुददयाद्वारे शासनास आमदार बाळा नर यांनी मागणी केली आहे.
000000