नवी मुंबई : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे  यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत एस सणस, SS टाईप,रूम नं 941, सेक्टर-3, कोपरखैरणे, नवी मुंबई, यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती.  सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आला.

तसेच, कोपरखैरणे विभागातील फेरीवाला व  दुकानांवर मार्जिनल स्पेस कारवाई करण्यात आली व एकूण 12500/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. कोपरखैरणे विभागातील सेक्टर 9 येथील एकूण 9 झोपड्या हटविण्यात आल्या.

सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच 8 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01 कारवाई करीता वापर करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *