अटलबिहारी वाजपेयी जयंतीदिनी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन
ठाणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने ठाण्यात २५ डिसेंबर रोजी बुधवारी अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सुमधूर गीतांच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली जाईल.
या कार्यक्रमात गायिका मधुरा देशपांडे, गायक सर्वेश मिश्रा, प्रीती निमकर-जोशी आणि अनिल वाजपेयी यांची मराठी-हिंदी गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. समीरा गुजर-जोशी यांच्याकडून निवेदन केले जाईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क : ९३२११९३७७५
रेल्वे स्टेशनबाहेर रक्तदान शिबीर
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्याकडून ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात येते. यंदा १९ व्या वर्षीही शिबिराची परंपरा कायम सुरू राहणार आहे. यंदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सॅटीस प्रकल्पालगत २५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ ते दुपारी दोनपर्यंत शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी पवित्र राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन संजय वाघुले यांनी केले आहे.
000000