मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षाखालील इयत्ता १० वी पर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा १० व ११ जानेवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या ३२ व मुलींच्या १६ शालेय कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार दिला जाईल.
श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/- (पाच हजार), अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/-, तृतीय क्रमांकास रोख रु.२,०००/- व चतुर्थ क्रमांकास रु.१,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित मुलांच्या किंवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय आईर (८६५५२३३७७८), श्री उद्यान गणेश मंदिर कार्यालय (०२२-२४४६६६३४), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे २४ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.