ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच परभणी मधील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा, न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या संविधान रक्षक,कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळलाच पाहिजे, अशा घोषणा देत ऑल इंडिया लायर्स युनियनतर्फे येथे निदर्शने करण्यात आली.
संसदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवारी, २३ डिसेंबरला अंधेरी न्यायालय प्रवेशद्वार येथे वकिलांची संघटना ऑल इंडिया लायर्स युनियनतर्फे येथे निदर्शने करण्यात आली.या प्रसंगी ॲड. चंद्रकांत बोजगर, ॲड,सुभाष गायकवाड, ॲड. यादव, ॲड.स्वरांशू, ॲड.प्रदीप साळवी यांची भाषणे झाली. यात ४० ते ४५ वकीलांचा सहभाग होता.