उल्हासनगर : चौथ्या अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट आर.एन्.रायकर आंतरराष्ट्रीय संमेलन तसेच परिसंवाद मध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या टीमने सहभाग घेतल्याबद्दल आयुक्त विकास ढाकणे यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.मुंबई मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय अध्याय आणि काँक्रीट मधील प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील घोष-मुखर्जी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या भारतीय अध्यायात महापालिकेच्या सहभागामुळे उपस्थित प्रतिनिधींना भविष्यात शहराच्या होणाऱ्या विकासात कार्बन उत्सर्जन याचे व त्यामुळे होणारे भविष्यातील चांगले वाईट परिणाम,दुष्परिणाम तसेच नैसर्गिक संसाधनाचा वापर करून शहराचा करावयाचा विकास आणि जागतिक स्थिरता या सर्व गोष्टींवर जगभरात काय काय घडत आहे याविषयी माहिती अवगत झाली.
आंतरराष्ट्रीय संमेलनातील या परिसंवादात भविष्यात शहराचा शाश्वत विकास कशा प्रकारे साधता येऊ शकतो यावर प्रकाश पड व चर्चा साधता आली.आय्.सी.ए.सी.आय्.संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर एस्.के.मांजरेकर यांनी संमेलन व परिसंवादात सहभागी झाल्या बद्दल उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानून अभिनंदन केले.
यावेळी आयुक्त विकास ढाकणे,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,किशोर गवस,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे,मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,शहर अभियंता तरुण शेवकानी,अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत खरात आणि महापालिकेचे सल्लागार अनिरुद्ध नाखवा उपस्थित होते.