ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्या पक्षात आहेत, त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केली.डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन आहे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट ), काँग्रेस, शिवसेना, आप, सपा या पक्षांनी सोमवारी ठाणे स्थानक परिसरातीलडॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी मोदी – शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. “तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधान आमचा अभिमान,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमित शहा मुर्दाबाद” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आम्ही हृदयातून घेत असतो. आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे. कारण, त्यांच्यामुळेच आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. स्वर्ग आणि नरक कुणीच पाहिलेले नाही. मात्र, इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखविला आहे, असे आव्हाड यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. १९५० साली भाजपच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आजही त्यांना मनातून संविधान नको आहे. म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यभर बॅनर लावून प्रश्न विचारणार
सरकारला सोमनाथ सुर्यवंशीला न्याय द्यायचाच नाही. जे सरकार सुर्यवंशीचे निधन कसे झाले ते सांगायला तयार नाही. ते सरकार न्याय कसा देणार? आपण पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारत आहोत. आता आम्ही राज्यभर “सुर्यवंशी कसा मेला” असा प्रश्न विचारणारे बॅनर लावू, असेडॉ.  जितेंद्र आव्हाड म्हणाले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *