नवी दिल्लीमधील ओएसिस वर्ल्ड रेकॉर्डचा ‘भारतीयरत्न’ तर मुंबईतील पत्रकार विकास संघाचा पीव्हीएस एक्सलन्स पुरस्कार

ठाणे : पत्रकारिता करत असताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना नवी दिल्लीतील ओएसिस वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीने  राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा भारतीयरत्न आणि मुंबईतील पत्रकार विकास संघाचा प्रतिष्ठेचा पीव्हीएस एक्सलन्स (बेस्ट रिपोर्टर) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे जिल्हाबरोबर पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण  जनजागृतीसाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांच्या पत्रकारितेची दखल सरकार दरबारी,  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यामुळे दिल्लीतील ओएसिस वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीयस्तरावर दिला जाणारा “भारतीयरत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती ओएसिस वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षा डॉ. सुषमा यांनी दिली.
मुंबईतील पत्रकार विकास संघाच्या १६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात राज्यातील पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. मालाडमध्ये झालेल्या सोहळ्यात डॉ. प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना मान्यवरांच्या उपस्थिती पीव्हीएस एक्सलन्स (बेस्ट रिपोर्टर) हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद प्रकाश मिश्रा यांनी सांगितले.
या अगोदर डॉ. प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शि.म.परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव,  हिंदुस्थान न्युज नेटवर्क यांचा “नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिवर बुक (आंतरराष्ट्रीय), इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, केंद्र सरकारशी संलग्न काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील नव्या फाऊंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान अशा अनेक राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *