मुंबई कुस्ती स्पर्धा
मुंबई : मुठा कॉलेज कल्याण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मुबई विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धेत भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यात प्रशिक्षण घेणाऱ्या मनिषा शेलार आणि सुदिक्षा जैस्वारने सुवर्ण पदकाची कमाई केली. मनिषाने ५० किलो वजनी गटात आणि सुदिक्षाने ६२ किलो वजनी गटात पहिला क्रमांक मिळवला.
मनीषा संतोष शेलार – अभिनव विद्या मंदिर कॉलेज , भाईंदर येथे आणि सूदिक्षा जैस्वार सेंट अँड्र्यूस कॉलेजमध्ये शिकत आहेत. मनिषाच्या शानदार कामगिरीमुळे त्यांच्या अभिनव विद्या मंदिराला स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा चषक मिळाला. वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन या दोघींना मिळाले.
पंजाब येथे १४ ते १७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी महिला कुस्ती स्पर्धत मनिषा, सुदिक्षा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. या यशाबद्दल दोघींचे श्री गणेश आखाड्यातर्फे खास अभिनंदन करण्यात आले.