मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन
मुंबई:-मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील मुले – मुली, द्वितीय श्रेणी (ब) आणि तृतीय श्रेणी (क) गट स्थानिक पुरुष, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक-अ, व्यावसायिक-ब, व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे या स्पर्धा खेळविण्यात येथील.
ज्या संलग्न संघाना उपरोक्त स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज व खेळाडूंची नोंदणी ऑलाईन पूर्ण करून आपला सहभाग नोंदवावा. त्याच बरोबर आपल्या विभागातील सहकारी संघांनही याची कल्पना द्यावी. हि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून असो. ला सहकार्य करावे असे आवाहन या परिपत्रकाद्वारे सचिव विश्वास मोरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे.