मुंबई : सांताक्रूझ येथील १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित ४० वी कै. भाऊसाहेब रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेत, श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संस्थेच्या मुलींच्या संघाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत सांघिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. तसेच १६ वर्षावरील मुलींच्या गटात नुपूर परब हिने प्रथम क्रमांक पटकाविला. खुल्या गटाच्या पुरलेला मल्लखांब रिले स्पर्धेत साक्षी मांजरेकर, उर्मिला घुरे, वैष्णवी पेडणेकर व नुपूर परब यांनी तिसरे स्थान पटकाविले, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
संघातील विजेते खेळाडू: १० वर्षाखालील गट: दिविजा केळकर, गार्गी दळवी, हीर गाला, कुमुद चौगुले, मीरा सकपाळ, प्रसिद्धी बोत्रे १२ वर्षाखालील गट: अन्वी जाधव, आराध्या खोत, आर्या सावंत, ओवी गुरव. १४ वर्षाखालील गट: आर्या पाटील, अकायशा शेट्टी, अद्विका गवस, वैष्णवी पेडणेकर १६ वर्षाखालील गट: श्रावणी भिंगार्डे, रिद्धी दळवी, नियती सावंत, मनश्री कोरगावकर. १६ वर्षावरील गट: कायरा लोबो, तनिष्का नगरकर, नुपूर परब, श्रद्धा मोरे, ईशा देसाई.या संघाच्या एकूण कामगिरीमुळे श्री समर्थ व्यायाम मंदिराने मल्लखांब क्रीडा क्षेत्रात आपली अव्वल परंपरा कायम ठेवली, आहे.श्री समर्थ व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक श्रेयस म्हसकर यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.