रमेश औताडे
मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
बीड जिल्हयातील मसाजांग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आंदोलनाचा  इशारा दिला असून मारेक-यांना कठोर शिक्षा होत नाही तसेच राजकीय वरदहस्त असणा-या नेत्याची हकलपट्टी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे अंकुश कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील,रघुनाथ पाटील, महेश डोंगरे ,धनंजय जाधव  आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. बिड जिल्ह्याचा बिहार होऊ नये व संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून काढून टाकावे.
धनजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकी कराड यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *