आठ दिवसांत अडथळे दूर करून रस्ता सुरु करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार
युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांचा पालिका प्रशासनाला इशारा
कल्याण : कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीसच्या ओव्हर ब्रिज रॅम्प कामी मुख्य वाहतुकीचा रस्ता बंद असल्याने वाहतुक प्रभावित होत असल्याने बैलबाजार प्रभागातील नागरिक वाहतुक कोंडीमुळे ञस्त झाले आहेत. बिघडलेले नियोजन, वाहतुक व्यवस्था व प्रंचड वाहतुक कोंडी यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आठ दिवसांत सॅटीसच्या ओव्हर ब्रीज रॅम्पच्या कमातील अडथळे दूर करून रस्ता सुरु करा अन्यथा नागरीकांसमवेत शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांनी स्मार्ट सिटी व महापालिका प्रशासन यांना दिला आहे.
बैलबाजार प्रभागात सॅटीसच्या पुलाचे शेवटच्या टप्प्यात, उतरता रॅम्प बनविण्याचे काम सुरु आहे. रॅम्पच्या कामामुळे बैलबाजार सर्कल ते रेल्वे स्टेशन रोड मुख्य रस्ता एक पदरी रस्ता वाहतुक सुरू आहे. मोरया हॉलच्या बाजुने सॅटीसच्या कामामुळे वाहतुकीचा रस्ता बाधित झालेला आहे. तसेच महावितरणचे विद्युत पुरवठा ट्रान्सफार्मर सॅटीसच्याकामी वाहतुकीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करत आहे. हा रस्ता कल्याण शिळरोड बैलबाजार सर्कल कडुन रेल्वे स्टेशन कडे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने, सॅटीसच्या कामी पुलाच्या शेवटच्या टप्प्यावर उतरता रॅम्प यामुळे एकपदरी वाहतुक सुरु असल्याने रहदारीस अडथळे निर्माण होऊन नित्यरोज मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडीचा सामना वाहनचालक व नागरिकांना करावा लागत आहे.
बैलबाजार प्रभागात अनेक हॉस्पिटल आहेत. वाहतुक कोंडीमुळे रुग्णवाहिका सेवा प्रभावित होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस काम नियोजनचा अभाव यामुळे वाहतुक कोंडीचा फटका नागरिकांना बसत असून वाहनचालक नागरीक हैराण आहेत. प्रचंड वाहतुक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. याबाबत बैलबाजार प्रभागातील नागरिकांनी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांच्या कडे वाहतुक कोंडी व होणार्या ञासाबद्दल कैफियत मांडली. पेणकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी सॅटीसच्या पुलाच्या शेवटच्या टप्प्यात रॅम्प ठिकाणी पाहणी केली.
तेव्हा प्रतीक पेणकर यांनी वाहतुक रस्त्याकामी अडथळा येणारे महावितरणचे विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर त्वरित हटवून स्थलांतरित करुन सॅटीस काम शेवटच्या टप्प्यातील रॅम्प कामाची गती वाढवून आठ दिवसांत बंद रस्ता सुरु करुन दुतर्फा वाहतुक सुरु करावी अन्यथा शिवसेना स्टाईल नागरीकांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्मार्ट सिटी व महापालिका प्रशासन यांना दिला.
