ठाणे : सम्रीत भाताचे झुंझार शतक, तिलक प्रजापती आणि अथर्व गावडेची अर्धशतकी खेळी, पार्थ बोडकेच्या उपयुक्त गोलंदाजीच्या जोरावर अनंत धामणे एकादश संघाने गणपत भुवड संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सरशी मिळवत ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने पावले टाकली. पहिल्या डावातील अनंत धामणे संघाच्या ९ बाद २६९ धावाना उत्तर देताना गणपत भुवड संघाला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ५ बाद १८५ धावापर्यंत मजल मारता आली.
सुरुवातीला प्रथम फलंदाजी करताना सम्रीत भटने ११८ धावांची खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. तिलक प्रजापतीने ५६ आणि अथर्व गावडेने ५० धावांचे योगदान दिले. या डावात आदित्य कोलगीने तीन, शौर्य साळुंखे आणि अमनसिंगने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यांनंतर पार्थ बोडकेने १३ षटकात पाच निर्धाव षटकांसह तीन बळी मिळवत गणपत भुवड एकादश संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला अर्धशतक बनवणाऱ्या तिलक प्रजापतीने एक बळी मिळवला. अफझल शेखने ७७ धावा करत संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आदित्य कौलगीने नाबाद २७, विहान तांबडकरने नाबाद १८ बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : अनंत धामणे एकादश : ( पहिला डाव ) ; ३९ षटकात ९ बाद २६९ ( सम्रीत भट ११८, तिलक प्रजापती ५६, अथर्व गावडे ५० , आदित्य कौलगी २५ -५ -८० -३, शौर्य साळुंखे २०-५-५६-२ ,अमनसिंग २०-३-५६-२) विरुद्ध गणपत भुवड एकादश : (पहिला डाव) : ६७ षटकात ५ बाद१८५ ( अफझल शेख ७७, आदित्य कौलगी नाबाद २७, विहान तांबडकर नाबाद १८, पार्थ बोडके १३-५-२६-३, तिलक प्रजापती २०-४-५९-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू :सम्रीत भट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *