मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा प्रथम मान प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गौरव मोरे यांनी आपल्या अभिनयातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला हा पुरस्कार साजेसा आहे. असे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.