४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश
अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील २५लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यातील २२ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याबाबतचा तपास केला जात आहे.
समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान क्रॅश झालं. स्फोटाचा व्हिडीओही समोर आला आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड जाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र नंतर हे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अजरबैझान एअरलाईनचं हे विमान होतं. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
अजरबाईजन एअर लाईन्सचं हे म्हणणं आहे की ज्या विमानाचा अपघात झाला त्याचा क्रमांक J2-8243 असा होता. बाकू पासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने या विमानाचं लँडिंग करावं लागलं. अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीसुरा हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी ५२ फायरफायटर्स आणि ११ बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत ज्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
