मुंबई: पिंपरी-चिंचवड विरुध्द पालघर, यजमान सांगली विरुध्द उस्मानाबाद या कुमारी गटाच्या उद्घाटनीय सामन्या बरोबरच अन्य चार सामन्याने सांगलवाडी, सांगली येथील ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. गत वर्षापासून या स्पर्धेत ६ संघांची वाढ केल्याने सहभागी होणाऱ्या ३१ संघांची ८ गटात विभागणी करण्यात आली आहे. सांगलवाडी, सांगली येथील चिंचबाग मैदानावर होणारी ही स्पर्धा मातीच्या ६ क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनि. दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ०८-३० वाजता करण्यात येईल. सामने सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविले जातील याची सर्व सहभागी संघाच्या व्यवस्थापक, प्रशिक्षक, संघनायक यांनी नोंद घ्यावी. या स्पर्धेची गटवारी राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी आज प्रसार माध्यमकरीता जाहीर केली. ती खालील प्रमाणे.
कुमारी (मुली) गट :- १)अ गट :- १)पिंपरी-चिंचवड, २)नाशिक शहर, ३)पालघर, २)ब गट :- १)पुणे ग्रामीण, २)सोलापूर, ३)पुणे शहर, ४)औरंगाबाद.,                            ३)क :- १) मुंबई उपनगर – पूर्व, २)ठाणे ग्रामीण, ३) जळगांव, ४)जालना., ४)ड :- १)कोल्हापूर, २)धुळे, ३)नाशिक ग्रामीण, ४)ह िंगोली, ५)इ :- १)मुंबई उपनगर-पश्र्चिम, २)परभणी, ३)नंदुरबार, ४)नांदेड, ६)फ :- १)सांगली, २)मुंबई शहर-पूर्व, ३) बीड, ४) उस्मानाबाद,                           ७)ग :- १)अहमदनगर, २)रायगड, ३)सातारा, ४)लातूर,  ८)ह :- १)सिंधुदुर्ग, २)मुंबई शहर-पश्र्चिम, ३)ठाणे शहर, ४)रत्नागिरी
कुमार(मुले) गट :- १)अ :- १)मुंबई उपनगर-पश्र्चिम, २)पुणे शहर, ३)मुंबई शहर-पश्र्चिम,                              २)ब :- १)पिंपरी-चिंचवड, २)सातारा, ३)अहमदनगर, ४)औरंगाबाद, ३) क :- १)पुणे ग्रामीण, २) जळगांव, ३)लातूर, ४)नाशिक ग्रामीण, ४)ड :- १)नंदुरबार, २)ठाणे शहर, ३)नांदेड, ४)सिंधुदुर्ग, ५)इ :- १)मुंबई उपनगर-पूर्व, २)जालना, ३)रत्नागिरी, ४)सोलापूर, ६) फ :- १)रायगड, २)पालघर, ३)बीड, ४)उस्मानाबाद, ७)ग :- १)कोल्हापूर, २)परभणी, ३)हिंगोली, ४)धुळे, ८) ह :- १)सांगली, २)ठाणे ग्रामीण, ३)नाशिक शहर, ४)मुंबई शहर-पूर्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *