आपल्या जगात खूप मोठी पर्वत आहेत ही माहिती प्रत्येकाला असणारच. परंतु वेगळी माहिती अशी की या पर्वतांच्या सोबतच जगात अनेक प्रचंड आकाराचे कृत्रिम पर्वत आहेत आणि त्यांचीच माहिती आज घ्यायची आहे. हे पर्वत प्रचंड आकाराचे असले तरी ते धोकादायक आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. कोणताही पर्वत किंवा उंच इमारतीच्या वरून आपण खाले पाहिले तर जसे रस्त्यावरील लोक आणि वाहने आपल्याला खेळण्यातली वाटतील तशीच काहीशी दृश्ये या पर्वतांवरून बघता येतात. या पर्वतांच्या भेगांमधून वनस्पती निर्माण होताना दिसतात. येथे पक्ष्यांचीही वर्दळ बरीच असते पण ते येथे केवळ आही खायला इलते का ते बघायला आलेले असतात. मिळाले तर ठीक…नाहीतर निघून जातात.
अनेक वर्षे जवळपास राह्नारांच्या दृष्टीने असा पर्वत आता तेथील स्वाभाविक रचनेचाच भाग झालेला असतो.आणि त्याचे कारण व्यवस्था स्टे हेही त्यांना माहिती असते. त्यामुले हा पर्वत मोठा होताना बघणे हेच र्तांच्या नशिबी असते असे म्हणावे लागेल. असे कृत्रिम पर्वत हे माणसाच्या निर्मिती बाबतच्या अमर्याद आशा आकांक्षा आणि याणून निर्माण होणारा कचरा यांच्यामधून तयार होत असतात. त्यासोबतच यात नवीन इमारती बांधण्यासाठी जुन्या इमारतींचे अवशेष फेकण्याचीही भर पडत असते, हे कमी की काय म्हणून घरा-घरातून एकत्र केलेया कचऱ्याचे देखील असेच प्रचंड पर्वत प्रत्येक शहरात तयार होत असतात. यातले अनेक पर्वत सुमारे २०० फूट किंवा त्याहून अधिक उंचीचे असू शकतात.
काही देशातील असे कृत्रिम पर्वत हे खनिज पदार्थाच्या मळीपासून तयार होतात कारण ही मळी म्हणजे कचरा कुठे फेकायचा असा प्रश्न असतो.फेकताना ही द्रवरूप असते परंतु काही वेळात किंवा दिवसात ती थंड आणि कडक होते. मग या खनिज खडकाला कुणी भेदू शकत नाही. परंतु या पर्वतांची किंवा त्यातील कोणते आणि किती पदार्थ धोकादायक आहेत याची अनेक देशांमध्ये गणना केली गेली नाहीय. इमारातीन्च्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या बातीत एक तज्ञ म्हणाले की त्यांची विल्हेवाट लावणे आठंत खर्चाचे काम असते आणि त्यामुळे ते फेकून दिले जात असावे.
या पर्वताना आगी लागण्याच्या घटना वारंवार होत असतात. त्यात आगीशिवाय आणखी डोका असा की जे पदार्थ यात जळतात त्याच्यामधून विषारी वायूंची निर्मिती होते आणि हे वायू वातावरणात पसरता आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आज असे जे पर्वत आकाराने लहान आहेत त्यांची उंची वाढून ते धोकादायक ठरू नयेत म्हणून एका सार्वजनिक संस्थेने सध्याच्या पर्वतावर जागोजागी आकारणे मोठे असे धार्मिक संदेश लावले आहेत. यामुळे तरी लोक येथे कचरा टाकणे थांबवतील अशी या संस्थेला आशा आहे.
खाली मोठा आणि वर निमुळता होत गेलेला असाच एक मोठा कृत्रिम पर्वत जेव्हा आपल्याच वजनाने कोसळला तेव्हा नुकसानही प्रचंडच झाले होते. या पर्वतांमध्ये कचऱ्याची जी भर पडते ती दाबली जात नसल्याने असा भुसभुशीत भाग कोसळून १९६६ साली प्रगत देशाच्या एका प्रांतातील ११५ मुलांचा त्याखाली दाबून मृत्यू झाला होता. २०१५ च्या अशाच एका भू-स्खलन अपघातात किमान ८५ लोक बेपाता झाले होते. एका ठिकाणी विमानतळाच्या जवळील अशा एका पर्वताचा भाग कोसळला. काही शहरांच्या नगर आणि महापालिका हुशार होत्या, त्यांनी या कृत्रिम पर्वतातील दगड, विटा आणि माती यांच्या उपयोग शहरातील रस्ते बांधण्यासाठी करून घेतला होता.
युरोपमधील काही वास्तू विशारदांनी ज्या प्रदेशामध्ये केवळ सपाट मैदाने होती अशा जागी चक्क कृत्रिम पर्वत उभारले आणि ते सुशोभित करून शहराची सुंदरता आणि या भागात घरांची विक्रीही वाढवली. परंतु हे कृत्रिम पर्वत तज्ञ मंडळीनी बनवले होते हे त्यातले वेगळेपण…
एकूण काय, पर्वत नसले तरी चालतील पण असे कृत्रिम पर्वत नकोत त्यापेक्षा आम्ही वृक्षराजी घनदाट करू…..
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *