मुंबई: भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेत दलित समाजातील अनेक महिलांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित केलेले आहे. अशा निवडक अज्ञात ,आदर्श ४२ मातांची समाजाला ओळख करून देणारा एक आगळा ग्रंथ ‘ आंबेडकरी आई ‘ येत्या शनिवारी २८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत प्रकाशित होणार आहे.
संध्याकाळी ४ वाजता दादर ( पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात हा प्रकाशन समारंभ आंबेडकरी स्त्री संघटनेने आयोजित केला आहे.
अर्थतज्ज्ञ,माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभात डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. डॉ. अजित मकदुम, डॉ. प्रज्ञा दया पवार हे प्रमुख वक्ते आहेत. ‘ आंबेडकरी आई ‘ या ग्रंथाचे संपादन प्रा. आशालता कांबळे आणि डॉ. श्यामल गरुड यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *