महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस मुदतवाढ

 

नवी मुंबई : सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस दि.10 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत 26,000 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदर गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाईन अर्जनोंदणी 10 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार असून, अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी 9930870000 व 8062368000 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात असे सिडकोने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *