कल्याण : समाज उद्धार समिती संचलित हिंदी बालनिकेतन शाळा व श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मोठ्या उत्साहात झाले. पुढील सात दिवस दोन्ही शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मार्चपास्टने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर शाळेचे संस्थापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मशाल प्रज्वलित करून मैदानाची फेरफटका मारली.
विद्यार्थ्यांनी लेजिम, झुंबा डान्स आणि देशभक्तीपर नृत्य सादर करून क्रीडांगणात नवी ऊर्जा भरली. मुलांच्या योग्य विकासासाठी शिक्षणासोबतच खेळाचेही महत्त्व आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची खेळाप्रती आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे मनोबल वाढावे या उद्देशाने शाळा व्यवस्थापनातर्फे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कैलास शिंदे, समाज उपाधार समितीचे संस्थापक बबन चौबे, मानपाडा पोलीस शिपाई विजय आव्हाड, रवींद्र कांगणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितिचे सचिव डॉ. जयप्रकाश शुक्ला, जीआरसीच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला, शिक्षक करण पाल, वंदना पाटील, मालती यादव, उपाध्याय, पवार, लालबहादुर यादव, पुजारी, ज्योति दुबे, नीतू सिंह, जयश्री ठाकुर, सीमा पाठक, वर्षा पाटील यांच्यासह दोन्ही विद्यालयांच्या सर्व शिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
00000
