ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘वीर बाल दिवसा’च्या निमित्ताने शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांचे छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्र. उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, तसेच, संदीप झिनवाल यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
