ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. अमली पदार्थांसदर्भातील गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या वर्षभरात अमली पदार्थांची ६५४ प्रकरणे समोर आली आहेत. २०२३ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण ४७५ इतके होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. यावर्षी अमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांमध्ये ५८ विदेशी नागरिकांना अटक झाली. यातील बहुतांश आफ्रिकेतील आहेत.

रेव्ह पार्ट्या किंवा इतर तस्करीच्या माध्यमातून अमली पदार्थ तरुण-तरुणींपर्यंत पोहचविले जातात. त्यामुळे या अमली पदार्थांच्या विळख्यात सर्वसामान्य घरामधील तरुण-तरुणी बळी पडत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये यावर्षी अमली पदार्थ संदर्भात ६५४ नोंद झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किंमतीचे आहे. यावर्षी १६ कोटी ७० लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून, २०२३ मध्ये एक कोटी २५ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते. तर १२ कोटी ६७ लाख रुपयांचे मफेड्राॅन जप्त करण्यात आले आहे.

गांजा आणि ब्राऊन शुगर जप्तीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ६७ लाख ८३ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तर जप्त ब्राऊन शुगरची किंमत ३० लाख १० हजार रुपये आहे. एलएसडी पेपरच्या तुकडेही पोलिसांनी जप्त केले. त्याची किमंत ३३ लाख ५५ लाख रुपयांचे जप्त करण्यात आले. प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत ३३ कोटी २७ लाख रुपये आहे. तर गेल्यावर्षी याचे प्रमाण २२ कोटी ९७ लाख रुपये इतके होते. २०२४ मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये ९३९ जणांना अटक झाली. तर गेल्यावर्षी ८११ जणांना अटक झाली होती. यावर्षी अटकेत असलेल्यांपैकी ५८ जण विदेशी नागरिक आहेत. यातील सर्वाधिक आफ्रिकेतील आहेत. तर २०२३ मध्ये ३७ विदेशी नागरिकांना अटक झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *