नवी दिल्ली : भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणा-या “जीवन गौरव” पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना नवि दिल्ली येथे झालेल्या समरंभात सन्मानीत करण्यात आले. येथे झालेल्या एका समारंभात एशियन सायकलिंग कॉन्फडरेशन (एसीसी) चे महासचिव ओंकार सिंग आणि नवी दिल्लीचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायीक आणि उद्योगपती गुरमीत सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतामध्ये सायकलिंग खेळासाठी २५ वर्षाहुन अधिक काळ प्रेरणादाया योगदान देणा-या व्यक्तीस या पुरस्काराने गौरविण्यात येते. प्रताप जाधव यांनी १९७७ ते १९८७ दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकिर्द गाजवली. यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व केले. दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली. जाधव यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी भारताममधील सर्वात जुन्या व खडतर समजल्या जाणा-या मुंबई – पुणे सायकल स्पर्धेत सहा वेळी सहभाग घेतला असून रौप्यमहोत्सवी स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. १९९३ पासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलिंग संघटनेत विविध पदावर काम केले आहे. जाधव सध्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष असून चार वर्षे ते सीएफआय चे खजिनदारही होते. संघटक म्हणून आपल्या ४० वर्षांच्या काळात प्रताप जाधव यांनी २३ वेळा मुंबई – पुणे सायकल स्पर्धा, १५ वेळा एमटीबी, ४ वेळा रो़ड आणि एकदा ट्रॅक अशा २० राष्ट्रीय सायकलिं अजिंक्यपद स्पर्धा, १० वेळा राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. भारमध्ये चार दिवसीय स्टेज सायकल स्पर्धा सलग दोन वर्षे आयोजित केली तसेच सर्वात लांब पल्ल्याची २५० किमी अंतराची कोल्हापूर – सातारा – कोल्हापूर एकदिवसीय सायकल स्पर्धा आयोजनाचा विक्रम आजही जाधव यांच्या नांवावर आहे. महाराष्ट्राचे उपमुंख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त पुणे ते बारामती राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन २००७ पासून त्यांनी केले आहे. प्रताप जाधव यांनी चार वर्षे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएसन (एमओए) मध्ये सयुंक्त सचिव म्हणून आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला.त्यांनी सुरु केलेल्या अनेक योजना आजही एमओए मध्ये यशस्वीरीत्या सुरु आहेत.
नवी दिल्ली येथे एका समारंभामध्ये सीएफआय चे महासचिव मनिंदर पाल सिंग यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की प्रताप जाधव यांचे कार्य व नवनवीन योजना आमच्या सारख्या नवोदित संघटकांना नेहमी मार्गदर्शक ठरल्या आहेत. सायकलपट्टू केंद्रबिंदू ठेवून जाधव यांनी अनेक नवीन बदल आणि प्रस्ताव राज्य – राष्ट्रीय पातळीवर सुचवले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली.
00000
