माथेरान : लहान मुले ही देवघरची फुले आहेत आणि जेव्हा त्यांना एखादी वस्तू किंवा साहित्य असो अथवा खाऊ असो हे त्यांना अचानकपणे प्राप्त झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य निर्माण होते त्यावेळी त्या कोवळ्या मुलांना भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तींना सुध्दा मनोमन आत्मीय समाधान मिळते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षात पदार्पण करताना आपला आनंद लहान मुलांना सोबत घेऊन द्विगुणित करावा याच मुख्य हेतूने प्रेरित होऊन मुंबई येथील

अजित शहा,सुरभी शहा,भारती दलाल,मुकेश दलाल या दांपत्यानी येथील नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले. जवळपास १५० पटसंख्या असलेल्या या शाळेत सर्वसामान्य कष्टकरी लोकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर तिन्ही अंगणवाडीच्या मुलांना देखील खाऊचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नितीन शहा, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे, शिक्षक लक्ष्मण ढेबे, सचिन भोईर, संतोष चाटसे, अमोल अंधारे , साक्षी कदम, मनिषा चौधरी , किरण शिंदे,पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *