ठाणे : एक दिशा मार्गिका असतानाही वाहतुक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करत असतात. अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी भागात महत्त्वाच्या ठिकाणी ‘टायर किलर’चा प्रयोग केला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या पंधरवड्यात हे टायर किलर बसविले जाणार असून विरुद्ध दिशेने वाहतुक केल्यास वाहनाच्या चाकाचे नुकसान होईल. त्यामुळे चाकाचे नुकसान टाळण्यासाठी चालक स्वत:हून विरुद्ध दिशेने वाहने चालविणार नाही असे पोलिसांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसविले जाणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हजारो वाहनांची वाहतुक होत असते. यामध्ये रिक्षा आणि दुचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असते. स्थानक परिसरातील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका वाहतुक पोलिसांनी केल्या आहेत. असे असले तरी या मार्गिकांवर वाहतुक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषत: रिक्षा चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे वाहतुक अडथळा होऊन कोंडी होत असते. विरुद्ध दिशेने वाहने चालविल्यास गंभीर अपघाताची शक्यता निर्माण होते.
शहरातील वाहतुक व्यवस्थेविषयी सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली होती. स्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने चालविण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर’ बसवण्याचा निर्णय त्यांनी या बैठकीत घेतला होता. त्यानुसार ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी काही क्षेत्र निश्चित करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार, ठाणे स्थानक परिसरातील शिवाजी महाराज पथ येथून गावदेवी मंदिराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर आणि गावदेवी मैदानालगतच्या एक दिशा मार्गिका निश्चित केल्या आहेत.त्यानुसार, येत्या काही दिवसांत हे टायर किलर या भागात लागण्याची शक्यता आहे. टायर किलर रस्त्यावर लागल्यास विरुद्ध दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांवर वचक बसण्याची शक्यता आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रयोगानंतर शहरातील इतर एकदिशा मार्गिकांवरही हे टायर किलर बसविले जाणार आहे. हे टायर किलर बसविण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर असल्याची माहिती देणारे फलक १०० ते २०० मीटर आधीपासून लावण्यात येत आहे. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतरच हे टायर किलर बसवले. टायर किलर हे गतीरोधकाप्रमाणे असतात. यावर लोखंडी काटेरी भाग असतो. वाहन योग्य मार्गाने आल्यास हे काटे खाली जातात. पण विरुद्ध दिशेने वाहन आल्यास चाकाचे लोखंडी काटेरी भागामुळे नुकसान होऊ शकते.
कोट
त्यानुसार, ठाणे स्थानक परिसरातील सुभाष पथ भाग, गावदेवी मंदीर परिसर आणि बी-केबीन परिसर निश्चित केले आहेत. – हे तीन लोकेशन दिले आहेत. त्याऐवजी – त्यानुसार, ठाणे स्थानक परिसरातील शिवाजी महाराज पथ येथून गावदेवी मंदिराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर आणि गावदेवी मैदाना लगतच्या एक दिशा मार्गिका निश्चित केल्या आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *