नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे २८ व २९ डिसेंबरला ‘पहिले अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ संपन्न होत आहे.
शनिवार, २८ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता उद्घाटनसत्रात, उद्घाटक किशोर कन्हेरे (अध्यक्ष, कन्हेरे फाऊंडेशन, नागपर), संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे (ज्येष्ठ साहित्यिक, अकोला), विशेष अतिथी डॉ. रवींद्र शोभणे (अध्यक्ष, ९७ वे अ. भा. म. सा. सं. अमळनेर) व उर्मिला देवेन (प्रसिद्ध कादंबरीकार, जपान), मुख्य अतिथी डी. बी. जगत्पुरिया (कवी, लेखक, पत्रकार, छ. संभाजीनगर) आयोजक शंकर घोरसे (अध्यक्ष, अक्षरक्रांती फाऊंडेशन) व डॉ. संगीता मानेकर-बानाईत (अध्यक्ष, कला गौरव संस्था) या मान्यवरांची उपस्थिती राहतील.
याच सत्रात ‘अक्षरक्रांती महाकाव्य स्पर्धे’चे विजेते माणीक सोनवणे (छ. संभाजीनगर), विद्या निनावे (नागपूर), भावना गंगमवार (यवतमाळ) यांना पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार दिले जातील. तसेच ‘आदर्श सरपंच’ मंगलाताई घोपे (जलम), ‘वृद्धसेवा’चे प्रदीप चंदनबटवे (श्री क्षेत्र आदासा), ‘कौमार्य’ मराठी चित्रपटाचे गीतकार संजय बंसल (उमरेड), सामाजिक कार्यकर्ते अनंत भारसाकळे (नागपूर) यांचा सत्कार केला जाईल. याचवेळी ‘अक्षरठेव’ स्मरणिका, देश-विदेशातील ११ कवी-लेखकांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन तसेच ज्या सदस्यांचे २०२३-२४ या वर्षात पुस्तके प्रकाशित झालीत, त्यांचा ‘साहित्य सन्मान सोहळा’ घेण्यात येईल.
दुस-या सत्रात ‘कथाकथन’ होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष विजय इंगळे पाटील (प्रसिद्ध कथाकार, आकोट), प्रमुख अतिथी संदीप निगळ्ये (राज फाऊंडेशन, गोवा) तसेच अजय बुवा (लोकमत ब्यरो चिफ, गोवा), सहभागी कथाकार अ. भा. ठाकुर (यवतमाळ), संघमित्रा खंडारे (दर्यापूर), प्रा. लता थोरात (अकोला) यांची उपस्थिती राहील. सूत्रसंचालन नरेंद्र माहूरकर करतील तर कीर्ती लंगडे आभार मानतील.
तिस-या सत्रात शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संध्या पवार यांची मुलाखत प्रकाश गायकी (पत्रकार, आकोट) हे घेतील. सूत्रसंचालन डॉ. लीना निकम करतील तर निमा बोडखे आभार मानतील.
चौथ्या सत्रात गजलकार बबन सराडकर,(अमरावती) यांच्या अध्यक्षतेत ‘गजल संमेलन’ होईल. प्रवीण बोपुलकर (अध्यक्ष, शब्दवेल, पनवेल) यांची प्रमुख उपस्थिती राहील. अजिज खान पठाण हे प्रमुख अतिथी असतील. अनंत नांदुरकर ‘खलीश’ (अमरावती) हे सूत्रसंचालन करतील तर आभार प्रसेनजित गायकवाड करतील.
पाचव्या सत्रातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनाला अध्यक्ष म्हणून रवींद्र जवादे (सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर) असतील. मधुकर वडोदे (खामगाव) हे अतिथी असून प्रताप वाघमारे (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती राहील. हितेश गोमासे हे सूत्रसंचालन करतील तर ज्योती बन्सोड आभार मानतील.
रविवार, २९ डिसेंबरला ९.३० वाजता सहावे सत्र सुरू होईल. यात ‘संतांचा कर्मयोग आणि साहित्य’ यावर परिसंवाद होणार आहे. डॉ. शुभदा फडणवीस (साहित्यिका, नागपूर) ह्या अध्यक्षस्थानी असून ज्ञानेश्वर रक्षक (सुप्रसिद्ध साहित्यिक) हे प्रमुख अतिथी असतील तर शफी पठाण (वरिष्ठ उपसंपादक, दै. लोकसत्ता, नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती राहील. यात डॉ. राजेश मिरगे (अमरावती), डॉ. मंदा चांदूरकर (अमरावती), डॉ. स्मिता मेहेत्रे (नागपूर) हे वक्ते लाभणार आहेत. विद्या सोनुले सूत्रसंचालन करणार असून उज्ज्वला पाटील आभार मानतील.
सातव्या सत्रात डॉ. शोभा रोकडे (साहित्यिका, अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली ‘कवयित्री संमेलन’ होणार आहे. अपूर्वा सोनार (अचलपूर) यांची प्रमुख उपस्थिती असेल तर वैशाली ढाकुलकर (अमरावती) ह्या प्रमुख अतिथी असतील. सूत्रसंचालन शीतल बोढे करणार असून प्रा. अरुणा डांगोरे आभार मानतील.
आठव्या सत्रात ‘वर्तमान शेतकरी दशा आणि दिशा’ यावर चर्चासत्र होणार आहे. गंगाधर मुटे (शेतकरी चळवळ, यवतमाळ) हे अध्यक्षस्थान भूषवणार असून डॉ. शरद निंबाळकर (माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ, अकोला) यांची उपस्थिती राहील. गोपाल कडूकर (संपादक, दै. दिव्य वतन, नागपूर) हे प्रमुख अतिथी असतील. यात वक्ता म्हणून अनंत भोयर (कचारीसावंगा), प्राची माहूरकर (नागपूर), सुनील चरपे (नागपूर) हे सहभागी होतील. सूत्रसंचालन कोकीळा खोदनकर करणार असून डॉ. संगीता मानेकर-बानाईत हे आभार मानतील.
नवव्या सत्रात ‘व-हाडी संमेलन’ होत असून ज्ञानेश वाकुडकर (लेखक व गीतकार) हे अध्यक्षस्थान भूषवतील तर प्रमुख उपस्थिती श्याम ठक (अध्यक्ष, व-हाडी साहित्य संघ, अकोला) यांची असेल तर किशोर मुगल (प्रसिद्ध व-हाडी कवी, चंद्रपूर) हे प्रमुख अतिथी राहतील. या संमेलनाचे सूत्रसंचालन अनिकेत देशमुख (वाशिम) व चंद्रशेखर महाजन (आकोट) हे करणार असून दिवाकर देशमुख आभार मानतील.
दहावे सत्र हे समारोपीय कार्यक्रम असून याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे (अकोला), विशेष अतिधी मनोज भारशंकर (अबुधाबी, युएई), विशेष उपस्थिती अशोक मानकर (माजी विधान परिषद सदस्य), प्रमुख अतिथी प्रमोद काळबांडे (संपादक, दै. सकाळ, नागपूर) अतिथी प्रा. अरुण पवार अध्यक्ष, म. फुले शिक्षण संस्था, नागपूर), अविनाश ठाकरे (अध्यक्ष, केजेफोसिया, नागपूर) हे उपस्थित राहतील. डॉ. संगीता मानेकर-बानाईत सूत्रसंचालन करतील तर आभार सचिन सुकलकर मानतील.
‘पहिल्या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवा’ला साहित्यिक, संशोधक, रसिकांनी उपस्थित राहून भरपूर प्रतिसाद द्यावा; असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष शंकर घोरसे, उपाध्यक्ष प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, सचिव डॉ. संगीता मानेकर-बानाईत, सहसचिव गणेश भाकरे, कोषाध्यक्ष भागवत बानाईत, सदस्य सचिन सुकलकर, लीलाधर दवंडे, विजय वासाडे, हितेश गोमासे, वंदना घोरसे तसेच अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्थेच्या समस्त सदस्यांनी केले आहे.
