डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणमहर्षी डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, विधी अधिकारी श्री.अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. विलास मलुष्टे, श्री. रवी जाधव आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
